‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. ती अगदी सातव्या महिन्यापर्यंत मालिकेत काम करत होती. याचा तिच्या सगळ्याच चाहत्यांना हेवा आहे.
अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. अभिनेत्री अपर्णा गोखले म्हणजेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील रेणुकाने मीनाक्षी आणि कैलास यांना अभिनंदन करत एक गोड पोस्ट शेअर केली आहे. विडिओ कॉल वरील फोटो टाकत , मीनाक्षी आणि कैलास तुम्हाला आभाळभर प्रेम ..कैमीन [कैलास चा कै आणि मीनाक्षी चा मीन म्हणजेच कैमीन] चे खुप खुप स्वागत..!लवकर ये, तुझी मोठी आई तुझी वाट पाहत आहे. तुमचा पहिला फोन मला करणे, ह्यासारखा दुसरा आनंद नाही. मला काय करूकाय नको असे झाले आहे.. खुप आनंद , खुप भाऊक, सगळया emotions एकदमच येत आहेत. खुप खुप प्रेम माझ्या बाहुलीला.. लव यू लॉट.. स्कूटर ची रिक्षा झाली हो.. ! दोनाचे तीन झाले.. असं गोड कॅप्शन तिने दिले आहे.
मीनाक्षी आणि कैलासचे ATOZMARATHI कडून खुप खुप अभिनंदन.