हृता दुर्गुळे मे महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आलंय. परंतु याबाबत हृताने अजुन काहीही खुलासा केला नाही. हृता सध्या ‘मनं उडु उडु झालं’ या मालिकेच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे . तसेच तिचा ‘अनन्या’ हा चित्रपट जुन महिन्यात प्रदर्शित होतोय. त्याच्या कामात देखील ती व्यस्त आहे. आणि सोबतच ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक हाऊसफूल चाललय .
आणि या सगळया बिझी शेड्यूलमधुन पण ती प्रतीक सोबत वेळ घालवताना दिसून येतेय. नुकताच सोशल मीडियावर हृताने एक फोटो पोस्ट केलाय पण त्यात प्रतीक दिसत नाहीये. पण हा फोटो मात्र प्रतीकंने काढलाय. या फोटोला हृताने ‘मेट माय रील वन्स , कॅपचर्ड बाय रीयल वन’ असं कॅप्शन दिलय. हा फोटो ‘टाइमपास ३’ च्या सेटवरचा असल्याच दिसून येतय कारण यात हृता, अजिंक्य आणि प्रथमेश परब दिसतायत . त्यांच्या या फोटोवर प्रतीक आणि हृता परफेक्ट जोडी अश्या कॉमेंट्स देखील आल्यात.
तर तुम्हांला हृता आणि प्रतीकची जोडी आवडते का ? ही कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.