देवमाणूस या मालिकेतून एसीपी दिव्या सिंग म्हणजेच अभिनेत्री नेहा खानची एक्जिट ?

झी मराठी वाहिनी वरील देवमाणूस या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या मालिकेची कथा आणि त्यातील पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या परंतु या मालिकेत आता खुपच ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळतायत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

देवसिंगला एसीपी दिव्याने पकडले असुन त्याला जास्तीस जास्त शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न ती करत आहे. या सगळया प्रयत्नांमध्ये तीला वकील आर्य देशमुखची साथ मिळाली आहे. पण डॉक्टर देखील आता उलटतपासणी करून दोघींना आव्हान देत आहे.

पण या मालिकेत आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार  या मालिकेत एसीपी दिव्या सिंगच्या जागेवर आता इन्स्पेक्टर शिंदे येणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. एसीपी दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खानची भूमिका प्रेक्षकांना खुपच आवडत होती . पण आता तिच्या एक्जिटमुळे मालिकेत खुपच गोष्टी बदलणार आहे.

 तर तुम्हांला अभिनेत्री नेहा खानची भूमिका कशी वाटते ? आणि तीला तुम्ही मालिकेत मिस कराल का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment