अभिनेत्री अभिज्ञा भावे पुढच्या महिन्यात विवाह बंधनात अडकणार

शर्मिष्ठा राऊत आणि सई लोकुर यांच्या पाठोपाठ अनलॉक मद्धे अनेक सेलेब्रिटी लग्नबंधनात  अडकतयात २०२१ ह्या नवीन वर्षात अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा होणार नवरा मेहुल पै लग्न करणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सध्या अभिज्ञाच्या सेलेब्रिटी मित्रांनी तिच आणि मेहुलच केळवण थाटामाटात केलं आहे. अभिज्ञा आणि मेहुलच केळवण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी पत्नी मिताली मयेकर यांनी केलं आहे. सिद्धार्थने सोशल मीडिया वर अभिज्ञाच्या केळवणाचे फोटो शेअर केले. या फोटोला रिपोस्ट करत अभिज्ञाने सिद्धार्थ आणि मितालीचे आभार मानले .

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये अभिज्ञा आणि मेहुल यांचा साखरपुडा पार पडला असून ते नविन वर्षात लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख अजून रिवील करण्यात आली नाहीये. परंतु ते पुढील महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी साखरपुडा देखील फार कमी माणसांच्या उपस्थित केला. ह्या कार्यक्रमाला फक्त अभिज्ञा आणि मेहुलच्या घरचेच उपस्थित होते.

अभिज्ञा आणि मेहुल गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांच्याही पहिल्या रिलेशन मध्ये अपयश आल्यानंतर हे दोघेही २ वर्षांपासून पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मित्रांनी त्यांना एकमेकांनविषयी विचार करण्याचा सल्ला दिला आणि अभिज्ञा आणि मेहुलने लग्न करण्याचा निर्णय घेतला.   

Tags: Abhidnya Bhave marriage in next month

Leave a Comment