बिग बॉस मराठी सीजन 3 लवकरच येतोय

बिग बॉस हा वादग्रस्त शो पण तितकाच लोकप्रिय देखील. बिग बॉस मराठी सीजन 3 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वर बिग बॉस मराठी सीजन 3 चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“ पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा दिमाखात उघडणार बिगबॉसच्या घराचं दार. पाहा #BiggBossMarathi लवकरच #ColorsMarathi वर. ” असे Caption देण्यात आले आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने पटकावले होते. पहिलाच मराठी सीजन खूप हिट ठरला. त्यानंतर दूसरा सीजन आला. बिग बॉस मराठी सीजन 2 चा विजेता शिव ठाकरे ठरला. हा शो देखील खूपच लोकप्रिय ठरला. आत्ता लवकरच बिग बॉस मराठी सीजन 3 येणार आहे.

बिग बॉस सीजन 3 नेमका कधी येणार हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याशिवाय या तिसऱ्या शोचे होस्टिंग कोण करणार हे देखील अजून स्पष्ट नाही. महेश मांजरेकर यांना host म्हणून प्रेक्षकांमधून आणि सदस्यांची देखील पसंती आहे. त्यामुळे हे तिसरा सीजन देखील महेश मांजरेकरच host करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या शो मध्ये कोण कोण सदस्य असतील ते पाहणे देखील औत्सुकयाचे ठरेल. बिग बॉसच्या घराची थीम कशी असेल हे देखील पाहायला लवकरच मिळेल.

https://www.instagram.com/p/CEj1O6wCgBi/

Tags: Bigg Boss Marathi 3, Bigg Boss Marathi Season 3, Bigg Boss Marathi Season 3 release date, Bigg Boss marathi 3 teaser

Leave a Comment