धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल केतकी चितळे विरुद्ध महाराष्ट्र सरकार करणार कारवाई?

पालघर मध्ये घडलेल्या घटनेला काहीजण आपापल्या परीने धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोसिअल मीडियाच्या माध्यमातून काहीजण या घटनेला हिंदू मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील केला आहे. यापूर्वी देखील तिने अश्या काही पोस्ट सोसिअल मीडिया वर पोस्ट केल्या होत्या. आत्ता अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील पालघर मधील घडलेल्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तिने फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली आहे कि “पालघर विषयी आपण बोलायचे नाही, कारण पंडितांना मरून टाकण्याविषयी बोललो तर त्याला धार्मिक तेढ निर्माण करणे म्हंटले जाते. भारतात हिंदू असणे हा गुन्हा झाला आहे. पण जिथे आपले तोंड आपलीच लोकं बंद करायला सांगतात, आपलच नाणं खोटे निघते, तिथे मार हा खावाच लागणार, प्राण हे गमवावे लागणार. काय कमाल आहे! – #an_unapologetic_हिंदू

परंतु हि घटना धार्मिक नसून त्या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट आहे. तेथील लोकांनी साधूंवर याच कारणामुळे हल्ला केला. महाराष्ट्र सरकारने देखील यावर आपलं स्पष्टीकरण दिल आहे कि

कोरोनाविरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता आहे आणि हे करत असताना काही गोष्टी अशा घडतात की त्या लांछनास्पद आहेत. काल दुपारनंतर सगळीकडे एक बातमी झाली पालघरची. हे १६ तारखेला घडलं, यापूर्वी गेल्या ५ वर्षांत अशा माॅब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत, जे होता कामा नये. ही आपली संस्कृती नाही.

मुद्दा येतो की ते झाल्यानंतर सरकार काय करते, हे पालघर जिल्ह्यात घडलं पण प्रत्यक्ष पालघरपासून ११० किमी अंतरावर दादरा नगर हवेली जो केंद्रशासित प्रदेश आहे त्या सीमेच्या जवळ हे घडलं. लॉकडाऊन परिस्थितीत हे २ साधू सरळ मार्गाने जाऊ शकणार नाही म्हणून दुर्गम भागातून जात होते.

त्यावेळी हे गुजरात मध्ये जात होते, दादरा नगर हवेली सीमेवर त्यांना अडवल गेलं, अडवल्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं आणि परतत असताना हा जो परिसर आहे हा परिसर अत्यंत दुर्गम आहे. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला केला गेला आणि त्यामध्ये दुर्देवाने त्यांची हत्या झाली.

समजा या काळामध्ये आपण सगळ्यांनीच माणुसकी पाळली अगदी दादरा नगर हवेली जिथे त्यांना अडवल गेलं तिथे त्यांना अडवून रात्रभर ठेवून  दुसऱ्या दिवशी जर महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली असती किंवा रीतसर सरकारच्या ताब्यात दिलं असतं तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती.

ही जेव्हा घटना घडली तेव्हा रात्री १२:३० वाजता SP तिथे पोचले. पोलिसांना सोबत घेऊन गेले. ताबडतोब बंदोबस्ताचे पोलिस तिथे लागले व पहाटे ५ वाजल्यापासून तिथल्या जंगलात आरोपींचा शोध सुरू झाला. १६ तारखेला घटना घडली, १७ तारखेला जवळपास १०० पेक्षा जास्त आरोपी पकडले गेले जे आज तुरुंगात आहेत.

१८ तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मुख्य म्हणजे यातले ५ जे मुख्य आरोपी आहेत ते आज तुरुंगात आहेत. पुलिस क्या कर रही है, सरकार क्या कर रही है? किया ना, कर रहे है, और किसीको हम छोड़ेंगे नहीं।

मी तुम्हाला वचन देतोय यात जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी आरोपी असतील त्यांनी हत्या तर केलेलीच आहे आणि पोलिसांवर सुद्धा हल्ला केला आहे. ते हल्लेखोर सुटणार नाही, सुटू शकत नाही. जो विश्वास तुम्ही महाराष्ट्र सरकारवर दाखवतात, हेच आमचं बळ आहे.

या बळावर जसं आपण कोरोनाच युद्ध जिंकणार आहेत, तसं गुंडगिरी आणि सोशल मीडिया वरून आग लावणारे लोकं आहेत त्यांनासुद्धा लवकरात लवकर पकडणे गरजेचं आहे. याबद्दल अमित शहांशी बोललो आहे, राज्य सरकारला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार आत्ता अभिनेत्री केतकी चितळे हिला देखील महाराष्ट्र सरकार पकडणार का हे पाहणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.

Title: Ketaki Chitale Palghar Incident Controversy

Leave a Comment